Dhule RTO : परिवहन विभागाच्या भोंगळ कारभाराचा वाहन चालकांना फटका, काय घडला प्रकार?
VIDEO | प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार उघड्यावर, काय घडला प्रकार?
धुळे : धुळे जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका वाहन चालकांना बसतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये स्मार्ट कार्ड आणि आरसी बुक मिळणे बंद झाले आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून आणि प्रक्रिया पूर्ण करून वाहन चालवण्याचा परवाना वाहनासाठी आरसी बुक दिले जाते. मात्र ज्या कजसगी कंपनी हे कार्ड देण्याचे काम करतात, त्यांचे पैसे थकल्याने त्यांनी काम बंद केले आहे. कंपन्यांनी काम बंद पुकारल्याने जिल्ह्यात हजारो वाहन चालकांचा वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहनाची आरसी बुक मिळालेली नाही. प्रादेशिक परिवहन विभागामध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही स्मार्ट कार्ड अथवा आरसी बुक मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन – तीन महिने उलटूनही स्मार्ट कार्ड मिळत नाही अशी परिस्थिती आहे. याबाबत संबंधित कंपन्यांना दंड करण्यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिले गेली आहे. मात्र गेल्या मार्च महिन्यापासून नागरिक सहन करत असलेल्या त्रासाबाबत मात्र विभाग बोलायला तयार नाही. जुलै महिन्यानंतर ही सर्व यंत्रणा सुरळीत होईल, असा दावा आरटीओ विभागाचा आहे.