Washim | वाशिममध्ये रस्त्याची दुरवस्था, प्रशासनाविरोधात मनसेचं ‘भजन कीर्तन’ आंदोलन
वाशिम जिल्ह्यातील अनसिग फाटा ते वारला रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक अपघात या रस्त्यावर झालेत, मात्र याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे याच्या नेतृत्वात खड्ड्यात बसून झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी 'भजन कीर्तन' आंदोलन करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातील अनसिग फाटा ते वारला रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक अपघात या रस्त्यावर झालेत, मात्र याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे याच्या नेतृत्वात खड्ड्यात बसून झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी ‘भजन कीर्तन’ आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी उपस्थित होती.