नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, हवामान खात्याकडून अवकाळीचा इशारा

| Updated on: Apr 26, 2023 | 9:58 AM

नांदेडमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. नांदेडमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

नांदेड : जिल्ह्यातील बहुतांश भागाला मंगळवारी सांयकाळी गारपीटीसह अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. तर अचानकपणे आलेल्या या पावसाने रस्त्यावरच्या विक्रेत्यांचे साहित्य भिजून मोठे नुकसान झालं. या अवकाळी पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. हवामान खात्याने आजही नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. विशेष म्हणजे आजची गारपीट आणि पाऊस जिल्ह्यातील माहूर, देगलूर कंधार , नायगांव अश्या बहुतांश भागात झालीय. त्यामुळे जिल्हाभरातील विविध शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे.

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा मारा सुरुच आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. शेतमाल पावसाच्या पाण्याता भिजत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता आता वाढल्या आहेत.

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हानेगांव सर्कलमध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय. याच दरम्यान कोकलेगाव इथल्या बालाजी बिरादार या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून तो जखमी झालाय. या जखमी शेतकऱ्यावर हानेगांव इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे या शेतकऱ्याचे प्राण बचावले आहेत.

 

Published on: Apr 26, 2023 09:57 AM
शिवसेना मंत्र्याची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका, म्हणाले, चुकीचे कंडक्टर
बुलढाण्यात अवकाळीचा पुन्हा फटका; बळीराजा खचला, झाडे रस्त्यावर उन्मळून पडली अन्…