Akshay Shinde Encounter Hearing : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले ‘हे’ सवाल
आरोपीला काबू करायला हवे होते, आरोपीला गोळी का मारली? तीन गोळ्या मारल्या, एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या? चार पोलीस एका आरोपीला नियंत्रण करु शकत नव्हते का? पिस्तूल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली? असे प्रश्न मुंबई हायकोर्टाने विचारले आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूकडून युक्तिवाद करण्यात आला होता. यानंतर एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने काही महत्त्वाचे सवाल केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन अहवाल पाहिल्यानंतर कोर्टाकडून त्यासंदर्भात काही निरीक्षण नोंदवण्यात आले. गोळी जवळून मारली गेली असं म्हणत असताना डोक्यात गोळी का मारली? असा कोर्टाने सवाल केला आहे. पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? अक्षय शिंदेंच्या डोक्यातच गोळी का मारली? सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही, आरोपीवर नियंत्रण का मिळवलं नाही, गोळी का मारली? 3 गोळ्या मारल्या, एक लागली, मग इतर दोन गोळ्या कुठे? 4 पोलीस एका आरोपीला कंट्रोल करु शकत नव्हते का? पोलिसांची पिस्तुल अनलॉक का होती? असे सवालही हायकोर्टाने उपस्थितीत केले तर घडलेल्या प्रकराला एन्काऊंटर बोलू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, असे कोर्टाने म्हटले आहे.