आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर संजय राऊतांसह इतर राजकीय नेत्यांची फायरिंग

| Updated on: Sep 25, 2024 | 11:13 AM

ज्या बदलापुरातील शाळेत 2 चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली त्या शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल, संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना वाचवण्यासाठी शाळेचा सफाई कामगार आणि आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

Follow us on

बदलापुरातील आरोपी अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. मात्र त्यानंतर राजकीय शाब्दिक एन्काऊंटर सुरु झाला. एका शिंदेचा एन्काउंटर झाला. आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करणार, अशी टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच आहे, त्यामुळे शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांनीही एन्काऊंटरच्याच भाषेत उत्तर दिलं. बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन विरोधकांनी शंका उपस्थित केलीय. ज्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार झाले तिथल्या फरार संस्थाचालकांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर झाल्याचं विरोधकांनी म्हटलंय. दुसरीकडे संजय राऊतांनी, मुख्यमंत्री शिंदेंवरच निशाणा साधला. एका शिंदेंचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करेल, असं राऊत म्हणाले आहेत. तर शरद पवारांची सुपारी घेवून राऊतांनीच उबाठाचा एन्काऊंटर केला, अशी टीका शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली. तर एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर करायला राऊतांना 7 जन्म घ्यावे लागेल, असं वक्तव्य शिवसेना नेते भरत गोगावले यांनी केलं. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील याबाबत वक्तव्य केलं. “एकनाथ शिंदेंनीच उद्धव ठाकरेंचा राजकीय एन्काऊंटर केला”, असं मंत्री रामदास आठवले म्हणाले.