ठाणे जिल्ह्यासाठी मोठी बातमी, बदलापूरचं बारवी धरण किती टक्के भरलं? पाण्याची चिंता मिटली की कायम?

| Updated on: Aug 06, 2023 | 2:29 PM

VIDEO | बदलापूर बारवी धरणाची सध्यस्थिती काय? किती टक्के भरलं धरण, ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली की कायम?

ठाणे, ६ ऑगस्ट २०२३ | ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून आज या धरणाचे जलपूजन भाजप आमदार किसन कथोरे यांनी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळेस धरणात फुल अर्पण करत श्रीफळ वाहण्यात आलं. या आमदार किसन कथोपे यांनी बारवी धरण पंचवीस-तीस वर्षापासून पडून राहिलं होतं यांना दिशा मिळत नव्हती आमच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे हे धारण पूर्ण होऊ शकल. धरण पूर्ण झालं नसतं तर ठाणे जिल्ह्याला पाणी मिळालं नसतं आणि आज त्याचा खरा उपयोग या ठाणे जिल्ह्यासाठी होतोय. बारावी धरण महत्त्वाचे धरण आहे, आज हे शंभर टक्के भरल्यामुळे नक्कीच या वर्षी पाण्याची टंचाई राहणार नाही असे मत मांडले.

Published on: Aug 06, 2023 02:29 PM
‘साठीपार! गेलेत, पण’; अजित पवार यांच्याकडून गिरिष महाजन यांचे कौतूक, इर्शाळवाडी दुर्घटनेच्या कामावर ही बोलले
‘दादा शब्दाचे पक्के, पण आता आमच्या सोबत’; अजित पवार यांच्या कौतूकावर महाजन यांची प्रतिक्रिया