‘तर मी तिचे पाय धरेल…’, ‘त्या’ पत्रकार महिलेवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Aug 21, 2024 | 4:24 PM

बदलापुरात झालेल्या चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने बदलापूरच नाहीतर संपूर्ण राज्यातील जनतेचा आक्रोश पाहिला मिळत आहे. अशातच काल बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला आर्वाच्य भाषा वापरल्याचे पाहायला मिळाले. वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला वापरलेल्या असंवेदनशील भाषेवरून पत्रकार आणि विरोधकांकडून संतापाची लाट उसळत आहे.

Follow us on

”तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे”.असं वादग्रस्त वक्तव्य वामन म्हात्रे यांनी केलं होतं. वामन म्हात्रे यांच्या वक्तव्यामुळे विरोधकही म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल करत आहे. अशातच महिला पत्रकार मोहिनी जाधव यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला असता, त्यांनी वामन म्हात्रे यांच्याशी झालेला संवाद सांगितला आणि वामन म्हात्रे यांच्याकडून वापरण्यात आलेल्या भाषेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करायला गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतले नसल्याचे सांगितले. यासर्व प्रकारावर वामन म्हात्रे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘पत्रकार मोहिनी जाधव ठाकरे गटाचं काम करते. ती स्टंटबाजी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं आरोप तिने केलेत. मोहिनी जाधव जे म्हणाली, ते शब्द माझे नाहीत. खरंच ती बदलापूरमध्ये जन्माला आली असेल तर तिने तिच्या आई वडिलांची शपथ घ्यावी. माझ्या तोंडून अपशब्द निघाला असता तर मी तिचे पाय धरून माफी मागितली असती. ‘, असे वामन म्हात्रे म्हणाले.