चिमुकलींची मेडिकल टेस्ट अन् पालकांना धक्का, बदलापुरात साडे 3 वर्षांच्या 2 चिमुकलींसोबत नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 21, 2024 | 11:00 AM

बदलापूर येथील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केले. मुलींनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला, यानंतर मेडिकल तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. तर भाजपच्या संबंधित लोकांशी शाळा असल्याने कारवाईमध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Follow us on

अवघ्या साडे वर्षाच्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्यानंतर आदर्श विद्यालय या शाळेची तोडफोड झाली. महिलांनी शाळेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि शाळेच्या निषेधार्थ आपला रोष व्यक्त केला. तर शाळेच्या प्रशासनावर प्रकरण दाबल्याचा आरोप आहे. १२ आणि १३ ऑगस्टला शाळेत साडे ३ वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाले. लघुशंकेसाठी जाताना सफाई कर्मचारी आरोपी २२ वर्षीय अक्षय शिंदेकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. सू सूच्या ठिकाणी दुखतंय असं सांगून लहानग्या मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला. पालकांनी तात्काळ डॉक्टरकडे धाव घेतली आणि मुलींची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर तपासणीत दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पालकांनी १६ ऑगस्टला पोलिसात धाव घेतली. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत १२ तास पालकांना वाट पाहावी लागली. बघा यानंतर नेमकं काय काय घडलं?