बिहारमध्ये बागेश्वर बाबाचा जोर, दरबारात धर्मावर भर अन् सरकारला लागला घोर
VIDEO | बागेश्वर बाबाच्या दरबारातून देव-धर्माचा नारा, दरबारात विरोधकांचा थाट तर सत्ताधाऱ्यांची मात्र पाठ, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : बागेश्वर बाबांची धूम सध्या बिहारच्या पटणा येथे पाहायाल मिळत आहे. बागेश्वर बाबांचा पाच दिवसांचा दरबार हा पटणा येथे होतोय. अशातच हिंदू राष्ट्राची भाषा करणाऱ्या बाबाच्या दरबारावरून बिहारचं राजकारण देखील चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बिहारमधील पटण्यात बागेश्वर बाबाच्या दरबारात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी याच दरबारात चेंगराचेंगरीचा प्रकार घडल्याचा समोर आला. दरम्यान, हिंदू राष्ट्राचा नारा देत बागेश्वर बाबा हिंदूंना एकत्र करण्यावर भर देताय. याच दरबारात भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर निमंत्रण देऊनही राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त राष्ट्रीय दलाच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. इतकेच नाही तर तेजस्वी यादव आणि तेजप्रसाद यादव यांनी बागेश्वर बाबावर जोरदार हल्लाही चढवलाय. तर दुसरीकडे बागेश्वर बाबांच्या दरबारापासून दूर ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. बागेश्वर बाबाच्या भाषणातून भाजप हिंदू राष्ट्राची संकल्पना राबवतोय, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे. काय मांडली त्यांनी भूमिका बघा स्पेशल रिपोर्ट…