बागेश्वर बाबांना अंनिसचं पुन्हा एकदा ‘तेच’ आव्हान, चॅलेंज स्वीकारणार की नाही?
VIDEO | बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा मुंबईत दिव्य दरबार, राजकीय वातावरण तापणार?
मुंबई : सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथील बागेश्वर बाबा आज पहाटेच मुंबईत दाखल झाले आहेत. आज आणि उद्या मीरारोड येथे बागेश्वर बाबा यांचा दरबार आयोजित करण्यात आला आहे. या प्रवचनात जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन होत असल्याने परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, नागपुरात बागेश्वर बाबांना अंनिसने दिलेले आव्हान यावेळी मुंबईत देखील देण्यात आले आहे. मात्र आता अंनिसने बागेश्वर बाबांना दिलेले चॅलेंज ते स्वीकारणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मीरा रोड येथे 2 दिवस होणाऱ्या बागेश्वर बाबांच्या दिव्य दर्शनाच्या कार्यक्रमाला विरोध करत अंनिसनेही पोलीसांपर्यंत धाव घेतली आहे. अंनिसचे अध्यश्र श्याम मानव म्हणाले की, आम्ही दिलेल्या तक्रारीत जादूटोणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण नागपुरात झालेल्या त्यांच्या दिव्य दरबारात या कायद्याचे वारंवार उल्लंघन झाले आहे. डॉक्टरची पदवी नसलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर उपचार करण्याचा दावा केला तरी ते कायद्याचे उल्लंघन असल्याचेही म्हटले आहे.