अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला पुराचा फटका

| Updated on: Aug 08, 2022 | 12:45 PM

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या अनेक घरात पुराचं पाणी शिरलं आहे.

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या अनेक घरात पुराचं पाणी शिरलं आहे. या पुरामुळे नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घराच्या भिंती कोसळल्या आहेत, तर कपडे,धान्य पुरात वाहून गेले आहेत. पुरामुळे बहादा गावातील अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरधारा सुरू आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड याहर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली, तर यवतमाळसह काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली.