किसानांची खिंड लढवण्यासाठी लहानगा ‘बाजी’ लाल वादळात सहभागी, बघा काय म्हणाला…
VIDEO | शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जीवा गावितांचा नातूही उतरला रस्त्यावर, बघा नेमका काय म्हणाला...
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून हा लाँगमार्च काढला आहे. मजल दरमजल करत किसान सभेचं हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने पुढे सरकतंय…या वादळाची खिंड लढवण्यासाठी एक छोट्या बाजीने देखील आपला सहभाग दर्शविला आहे. या लहानग्याचं नाव बाजी गावित असं असून तो या किसान सभेच्या मोर्च्याचे नेतृत्वं करणारे जे पी गावित यांचा नातू आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग निघावा यासाठी आपला सहभाग दर्शविला आहे. या लहानग्याचा तरी आवाज सरकारपर्यंत पोहोचणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री दादा भुसे, अतुल सावे आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांमध्ये सुरू असलेली बैठक दोन तासांनी संपली असून उद्या दुपारी ३ वाजता शिष्ठमंडळाची मुख्यमंत्र्यासह चर्चा होणार आहे.