मुंबईच्या Maladमध्ये Bajran Dal, BJPचं आंदोलन, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबईच्या Maladमध्ये Bajran Dal, BJPचं आंदोलन, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

| Updated on: Jan 26, 2022 | 7:08 PM

आंदोलकांना आवर घालण्यासाठी यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या समर्थनार्थ येथे त्यांचेही कार्यकर्ते जमले आहेत, आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.

मुंबई : मुंबईत सध्या टिपू सुलतान (Tipu Sultan) नावावरून जोरदार राजकारण पेटलं आहे. आधी या नावाला भाजपने (Bjp) कडाडून विरोध केला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य करत विरोध दर्शवला आणि आता टिपू सुलतान या नावावरून बजरंग दल (Bajrang Dal)चांगलेच आक्रमक झाले आहे. मालाडमधील ज्या क्रिडा संकुलाच्या नावावरून हा वाद पेटला आहे, त्या क्रिडा संकुलाच्या बाहेर बजरंग दलाने जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी बजरंग दलाकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलकांना आवर घालण्यासाठी यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या समर्थनार्थ येथे त्यांचेही कार्यकर्ते जमले आहेत, आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.

विकासाचं बघा, नावांमध्ये अडकू नका -Aslam Shaikh
HOME INSURANCE | एक कप चहापेक्षाही हा विमा स्वस्त आहे तुम्ही खरेदी केलाय का ?