Bala nandgaonkar : बाळा नांदगावकरांची संजय राऊतांवर टीका, काय म्हणाले नांदगावकर?
. प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला असेल तर त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. याविषयी स्वत: राज ठाकरेच बोलू शकतील, असे यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. यावर उलटसुलट चर्चा करण्याची आवश्यकता नाही. ते 22 तारखेला बोलणारच आहेत. त्यावेळी ते दौरा रद्द का केला, याबद्दल सांगतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala nandgaonkar) यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावेळी सुरक्षा पुरवू, असे म्हणणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्येही म्हटले आहे, की 22 तारखेला बोलूच. त्यामुळे तुमच्यासह मलाही उत्सुकता आहे, की ते काय बोलतील. तर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यावर मात्र नांदगावकर यांनी बोलणे टाळले. प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला असेल तर त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. याविषयी स्वत: राज ठाकरेच बोलू शकतील, असे यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.