Bala Nandgaokar LIVE | राजसाहेबांच्या रक्तातच हिंदुत्व : बाळा नांदगावकर

| Updated on: Aug 06, 2021 | 1:48 PM

मनसे पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेणार आहे का?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा काही प्रश्नच येत नाही. आम्ही हिंदुत्व घेऊनच जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट झाली. या भेटीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं. त्यामुळे राज-पाटील भेटीत युतीवरच अधिक चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केलं. राज ठाकरे, अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल, असं नांदगावकर म्हणाले. मनसे पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेणार आहे का?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा काही प्रश्नच येत नाही. आम्ही हिंदुत्व घेऊनच जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

BJP MNS Yuti | राज ठाकरेंची सदिच्छा भेट, चर्चेत युतीचा प्रस्ताव नाही : चंद्रकांत पाटील
Sanjay Raut | पेगाससवर केंद्र सरकार चर्चा करायला तयार नाही : संजय राऊत