‘बाळासाहेबांचं स्मारक राज ठाकरे यांच्याशिवाय दुसरं कोणी बनवू शकत नाही’, मनसे आमदाराला विश्वास

| Updated on: Aug 10, 2023 | 7:34 PM

VIDEO | 'बाळासाहेबांचे स्मारक खरोखरच चांगले करायचे असेल तर राज यांच्या व्हिजनने विचारांनी व्हायला पाहिजे', बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी केली मागणी

ठाणे, १० ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर मनसे आमदार यांनी बोलताना राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वीच्या भाषणाच्या काही क्लिप आहेत. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी ते संग्रहित करून ठेवल्या आहेत. यासह अशी देखील माहिती मिळते की, राज यांनी तो संग्रह उद्धव यांना दिला पण होता. माझी अशी मागणी आहे की बाळासाहेबांचे स्मारक खरोखरच चांगले करायचे असेल तर राज यांच्या व्हिजनने विचारांनी व्हायला पाहिजे, अशी मागणी राजू पाटील यांनी केली. पुढे ते असेही म्हणाले की, राज्यातील बाळासाहेबांच्या नावाचे पहिले स्मारक नाशिकमध्ये आहे. तेथे शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तेव्हा देखील राज ठाकरे असे बोलले होते की, बाळासाहेबांचे स्मारक असे असले पाहिजे की त्यातून शस्त्र बाहेर आली पाहिजे. तसेच राज ठाकरे यांच्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दुसरं कोणी बनवू शकत नाही. त्यांचा विचार घ्यायला हरकत नाही असे मतही राजू पाटील यांनी मांडले.

Published on: Aug 10, 2023 07:33 PM
‘मला बच्चू कडू यांच्या जागी आमदारकी द्या’, कुणी केली थेट मागणी?
‘मोदी तेरी कब्र खुदेगी…’, विरोधकांच्या पसंतीच्या घोषणेवर पंतप्रधान आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?