Eknath Shinde : माझ्या उद्धवला सांभाळा… बाळासाहेबांची ‘ती’ खुर्ची आज शिंदेच्या मेळाव्यात दिसणार
VIDEO | बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणातील खुर्ची एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात शिवसैनिकांना पाहायला मिळणार आहे. त्याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे केले होते आणि तर माझ्या उद्धवला सांभाळा अशी भावनिक सादही दिली होती.
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आहे. एक शिंदे गट आणि ठाकरे गट. दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजीपार्क तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून शिवसैनिक मेळाव्याला येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र यंदा देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणातील खुर्ची एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात शिवसैनिकांना पाहायला मिळणार आहे. त्याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे केले होते, ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली आहे. गेल्यावर्षी एम.एम.आर.डी.ए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. यंदाही बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार आहे. तर माझ्या उद्धवला सांभाळा अशी भावनिक साद शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या भाषणातून दिली होती.