बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचं प्रतिक : संजय राऊत

| Updated on: Jan 23, 2022 | 11:21 AM

आज बाळासाहेब असते तर तुम्ही म्हणता काय झालं असतं… आज बाळासाहेब असते तर बऱ्याच गोष्टी झाल्या नसत्या आणि नव्याने काही घडल्या असत्या, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना आज बाळासाहेब असते तर काय चित्रं असतं? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज बाळासाहेब असते तर तुम्ही म्हणता काय झालं असतं… आज बाळासाहेब असते तर बऱ्याच गोष्टी झाल्या नसत्या आणि नव्याने काही घडल्या असत्या. विशेषता विरोधी पक्षात जी काव काव चिवचिव सुरू आहे. फडफड सुरू आहे तडफड सुरू आहे ती बाळासाहेबांच्या अस्तित्वानेच थंड पडली असती. बाळासाहेबांचा स्वभाव हा सौ सोनार की एक लोहरकी असा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होता. बंदुकीची गोळी होती. ती वेधच घ्यायची. नेम चुकत नव्हता कधी, असं राऊत म्हणाले.

सत्ता गेल्यानंतर भाजप विचलित झालीय, नाना पटोलेंचा निशाणा
तुळजाभवानी मंदिरात 11 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा दणका