BhauBeej 2023 : संगमनेरमध्ये थोरात आणि तांबे परिवाराची भाऊबीज, कुणी कुणाला केलं औक्षण?
थोरात आणि तांबे कुटुंबियांकडून भाऊबीज साजरी करण्यात आली आहे. थोरातांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन आपली भाऊबीज साजरी केली. तर थोरातांच्या कन्यांनी सत्यजित तांबे यांचे औक्षण करत भाऊबीज साजरी केली आहे. सत्यजित तांबे यांचे मामा असलेले थोरात हे संगमनेरमधील तांबेंच्या निवासस्थानी दाखल
संगमनेर, अहमदनगर, १५ नोव्हेंबर २०२३ | सध्या राज्यभरात दीपावलीच्या उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीतील आज भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजारा होत आहे. यामध्ये राजकीय नेते मंडळीदेखील मागे नाहीत. तर राजकीय नेत्यांची भाऊबीज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आज संगमनेर, अहमदनगरमध्ये थोरात आणि तांबे कुटुंबियांकडून भाऊबीज साजरी करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन आपली भाऊबीज साजरी केली. तर थोरातांच्या कन्यांनी आमदार सत्यजित तांबे यांचे औक्षण करत भाऊबीज साजरी केली आहे. आमदार सत्यजित तांबे यांचे मामा असलेले बाळासाहेब थोरात हे संगमनेरमधील तांबे यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. यावेळी त्यांच्या परिवारात भाऊबीज उत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी बाळासाहेब म्हणाले, दिपावली हे आनंदाचे पर्व आहे, त्यात भाऊबीज म्हणजे मनाला भिडणारा क्षण. नाते, परंपरा जपणारा दिपावलीचा सण हा भाऊबीजेचा असतो. राज्यपुढे, देशापुढे अनेक संकट आहेत. मात्र दिपावली आपण आनंदाने साजरी करतो. भाऊबीजेला आम्ही कार्यकर्त्यांसह दुर्गाताईकडे येतो. यावेळी आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक भाऊबीज अविस्मरणीय असते, असेही त्यांनी म्हटले.