नवाब मालिक बोलतायत ती वस्तुस्थिती असेल तर ही गंभीर बाब : बाळासाहेब थोरात

| Updated on: Oct 29, 2021 | 2:54 PM

नवाब मालिक बोलतायत ती वस्तुस्थिती असेल तर ही गंभीर बाब आहे.यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विश्वासहर्ताचा प्रश्न निर्माण झालेला दिसतोय. सर्वसामान्य लोकांनी विश्वास कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ड्रग्ज हा विषय गंभीर आहे त्याची सवय लागू नये हे आम्हाला मान्य आहे असं म्हटलंय. पण जी वस्तुस्थिती आहे ती तपासली पाहिजे.नवाब मालिक बोलतायत ती वस्तुस्थिती असेल तर ही गंभीर बाब आहे.यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विश्वासहर्ताचा प्रश्न निर्माण झालेला दिसतोय. सर्वसामान्य लोकांनी विश्वास कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. जे खरं असेल ते पुढे आलं पाहिजे. सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे केलं जातंय हे तर दिसतंय, असं थोरात म्हणाले. भाजपचे नेते सांगतायत आम्हाला भीती नाही कारण आम्ही भाजपत आहोत त्यामुळं यंत्रणांचा वापर राजकारणासाठी होतोय हे दिसतंय, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 October 2021
Aryan Khan Bail | आर्यन खानची तुरुंगातून सुटका होणार ?