Raigad Roha River Rafting | ऐन हंगामात कुंडलिका नदीमधील रिव्हर राफ्टिंगवर बंदी
2003 साली निसर्गाच्या सानिध्यातील , नदीच्या खळखळणाऱ्या निथळ पाण्यावर सुरू झालेली ही सर्वात सुरक्षित राफ्टिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण व पर्वणी ठरतेय. अनेक पर्यटक येथे रिव्हर राफ्टिंगचा थरार अुभवण्यासाठी येतात. पर्यटनावर आधारित रोजगाराला यातून चालना मिळतेय. रिव्हर राफ्टिंगचा साहसी खेळ व थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येथे दैनंदिन येतात.
रायगड : ऐन हंगामात रायगडमधील(Raigad) कुंडलिका नदीवरील(Kundlika river) राफ्टिंगवर बंदी(Ban on rafting ) घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड इथली वर्षाचे 12 ही महिने चालणारी कुंडलिका नदीवरील राफ्टिंग जगप्रसिद्ध आहे. 2003 साली निसर्गाच्या सानिध्यातील , नदीच्या खळखळणाऱ्या निथळ पाण्यावर सुरू झालेली ही सर्वात सुरक्षित राफ्टिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण व पर्वणी ठरतेय. अनेक पर्यटक येथे रिव्हर राफ्टिंगचा थरार अुभवण्यासाठी येतात. पर्यटनावर आधारित रोजगाराला यातून चालना मिळतेय. रिव्हर राफ्टिंगचा साहसी खेळ व थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येथे दैनंदिन येतात. मौजमस्ती करतात, सुट्टीच्या दिवसात तर इथल्या स्थानिक व्यवसायांना दुपटीने उभारी मिळते. पर्यटनावर आधारित रोजगाराला यातून चालना मिळतेय. मात्र आजमितीस ऐन हंगामात येथील राफ्टिंगवर बंदी आणलीय. काही मोजक्या लोकांच्या आडमुठे धोरणामुळे राफ्टिंग व्यवसाय बंद पडलाय.