बंडातात्या कराडकार यांच्या याच वक्तव्याने मोठा वाद, ऐका नेमकं काय म्हणाले बंडातात्या…

| Updated on: Feb 04, 2022 | 10:33 PM

राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले. इतकंच नाही तर पतंगराव कदम यांचा मुलगा कशाने मेला? आमदार बाळासाहेब यांचा मुलगा दारु पित नाही का? असे सवालही बंडातात्या यांनी केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले. इतकंच नाही तर पतंगराव कदम यांचा मुलगा कशाने मेला? आमदार बाळासाहेब यांचा मुलगा दारु पित नाही का? असे सवालही बंडातात्या यांनी केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणाविरोधात काल बंडातात्या यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. प्राथमिक स्वरुपात आम्ही हे आंदोलन केलं. हे आंदोलन इथं थांबणार नाही, विस्कळीत होणार नाही. यापुढे हे आंदोलन उग्र होत जाईल. मग कुठेतरी शासनावर सध्या चढलेली मद्याची धुंदी उतरेल आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागेल, असं मत बंडातात्या यांनी केलं होतं.

Special Report | मुंबईतील घटस्फोटांमध्ये 3 टक्के वाटा ट्रॅफिकचा! अमृता फडणवीसांच्या वक्तव्यानं नवा वाद
हा पिक्चरचा सीन नाही, पण पिक्चरच्या सीनपेक्षा कमीही नाही! कांदिवलीत प्लॅटफॉर्मवर चोर-पोलिसाचा थरार