परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण? नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 21, 2024 | 2:48 PM

परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. याच निषेधार्थ आज घाटनांदूर येथे बंदची हाक देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील घाटनांदूरमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ घाटनांदूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. याच निषेधार्थ आज घाटनांदूर येथे बंदची हाक देण्यात आली आहे. माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर घाटनांदूर येथील मतदान केंद्रात वोटर मशीनची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान आज याच घटनेच्या निषेधार्थ घाटनांदूर बंद ठेवण्यात आले आहे. माधव जाधव हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत. मतदानादरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात त्यांना धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून मारहाण झाली होती. या घटनेनंतर सर्व स्तरातून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आज माधव जाधव यांच्या समर्थनार्थ घाटनांदूर परिसर बंद ठेवण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

Published on: Nov 21, 2024 02:48 PM
विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, भाजपचे वरिष्ठ नेते कोणाला साधणार संपर्क?
Bacchu Kadu : विधानसभेच्या निकालाआधीच बच्चू कडूंचा सत्तास्थापनेबद्दल मोठा दावा, ‘आमच्याशिवाय सत्ता स्थापन….’