VIDEO : Amravati | त्रिपुरातील हिंसेचे दुसऱ्या दिवशीही पडसाद , बंदला हिंसक वळण
त्रिपुरातील घटनेचे आज दुसऱ्या दिवशीही अमरावतीत तणाव आहे. भाजपने अमरावती बंदची हाक दिलेली असतानाच आज शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली. अनेकजण तोंडाला रुमाल बांधून आले होते. तर काहींच्या हातात काठ्या होत्या. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत या तरुणांनी तोडफोड केल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता.
त्रिपुरातील घटनेचे आज दुसऱ्या दिवशीही अमरावतीत तणाव आहे. भाजपने अमरावती बंदची हाक दिलेली असतानाच आज शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली. अनेकजण तोंडाला रुमाल बांधून आले होते. तर काहींच्या हातात काठ्या होत्या. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत या तरुणांनी तोडफोड केल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्रिपुरातील घटनेच्या काल मुस्लिम समुदायांनी अमरावतीत आंदोलन केलं होतं. मुस्लिमांनी दगडफेक केल्याने अमरावतीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती.