Mumbai | न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांसह पालकांचे शाळेसमोर आंदोलन
मुंबईच्या वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूलबाहेर शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन छेडले आहे. शाळेबाहेर पालक आणि लहानगे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहत आंदोलन केले आहे.
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान काही शाळा या शिक्षणाखाली मनमानी कारभार करत असल्यची तक्रारही पालंकाकडून केली जाते. मुंबईच्या वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल विरोधात देखील अशीच तक्रार पालकांनी केली असून फि भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण बंद केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यानंतर शाळेबाहेर शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी भीक मांगो आंदोलन छेडले असून शाळेबाहेर पालक आणि लहानगे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहत आंदोलन केले आहे.