शेख हसीना यांनी देश का सोडला? बांग्लादेशमध्ये अराजकतेचं कारण नेमकं काय?
शेख हसिना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका शहर सोडलं आहे. या संपूर्ण घटनेने बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दरम्यान, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला आरक्षण देण्याचा निर्णय होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना सरकारी नोकरीत ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय होता
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. शेख हसिना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका शहर सोडलं आहे. या संपूर्ण घटनेने बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दरम्यान, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला आरक्षण देण्याचा निर्णय होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना सरकारी नोकरीत ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय होता. याच निर्णयाविरोधात हजारो विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं. तर गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या निर्णयाला तीव्रतेने विरोध होत असताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकरीतील आरक्षणाचा कोटा ५ टक्क्यांवर आणला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५ टक्क्यांमधील ३ टक्के कोटा स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना देण्यात आला. आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात शेख हसीनांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि आंदोलनाला हिंसक वळण आलं. बांग्लादेशात नेमकं काय घडलं? बांग्लादेशमध्ये अराजकतेचं कारण नेमकं काय? बघा व्हिडीओ