‘सकाळच्या भोंग्याला पुरून…’, ‘सामना’बाहेर राणे समर्थकांनी झळकवले बॅनर अन् राऊतांना डिवचलं

| Updated on: Jun 23, 2024 | 3:43 PM

सामना कार्यालयाबाहेर भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. सामना कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅनरमधून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बघा या बॅनरवर नेमका काय लिहिलाय आशय?

भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात नितेश राणे यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. अशातच सामना कार्यालयाबाहेर भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. सामना कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅनरमधून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या बॅनरवर सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ, असा उल्लेख करत संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांच्या समर्थकांनी निशाणा साधला आहे. दरम्यान नितेश राणे यांचा आज वाढदिवस असून नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राणे समर्थकांनी हे जोरदार बॅनर सामना कार्यालयाबाहेर झळकवल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बॅनरवरच्या आशयानं चर्चांना एकच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या बॅनरवरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 23, 2024 03:43 PM
मुस्लिमांनाही कुणबीतून आरक्षण? जरांगेंच्या ‘त्या’ मागणीनंतर लक्ष्मण हाकेंचं म्हणणं काय?
Central Railway Update : मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा, कारण नेमकं काय? ट्रॅकवरून चालण्याचा प्रवाशांनी पत्कारला धोका