Nagpur : नागपुरात बँनरबाजी, राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स पालिकेनं काढले

| Updated on: May 28, 2022 | 1:29 PM

नागपूर मनपाच्या पथकानं हे पोस्टर्स, बॅनर्स काढले आहे.  यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

नागपूर :  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणावरुन वारंवार ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय. महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील त्यांच्यावर वेळोवेळी पलटवार केल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. राणा दाम्पत्य नागपुरात (Nagpur) दाखलं झालं आहे. यावेळी  खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं स्वागत करण्यात आलंय. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स (Banners), पोस्टर्स लावण्यात आले होते. नागपूर मनपाच्या पथकानं हे पोस्टर्स, बॅनर्स काढले आहे.  यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. बजाजनगर (Bajajnagar) चौकापासून ते लोकमत चौकापर्यंत हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे का, याचा जाब विचारण्यात आलाय. शिवाय रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय.

Published on: May 28, 2022 01:29 PM
Brijbhushan Singh : बृजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात मनसेची तक्रार! वक्तव्य भोवणार?
Sanjay Raut : 2024मध्ये कोण मसणात जाईल ते कळेलच, संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर