कोकणात महायुतीतच बॅनर वॉर… बाप, कुत्ता, झुंड अन् हिसाब; नेमके काय झळकले बॅनर?

| Updated on: Jun 17, 2024 | 10:32 AM

कणकवलीमध्ये लागलेल्या सामंत बंधू यांच्या बॅनरनंतर उदय सामंत यांच्या पाली या गावी भाजपचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. बाप बाप होता है, असे बॅनर उदय सामंत यांच्या पाली या गावात लागले आहे. तर उदय सामंत यांच्या बॅनरवर वक्त आने दो... बघा कोकणात कसं रंगतंय बॅनर वॉर....

रत्नागिरी-सिंधुदुर्गात बॅनर वॉर सुरू झालंय. कोकणात भाजप आणि शिंदे गटात चांगलंच बॅनर वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे. कणकवलीमध्ये लागलेल्या सामंत बंधू यांच्या बॅनरनंतर उदय सामंत यांच्या पाली या गावी भाजपचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. बाप बाप होता है, असे बॅनर उदय सामंत यांच्या पाली या गावात लागले आहे. तर उदय सामंत यांच्या बॅनरवर वक्त आने दो… जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे… असं लिहिल्याचे पाबायला मिळत आहे. उदय सामंत यांनी त्यांच्या घरासमोर लावलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या घरासमोर कोणी बॅनर लावले याचा मला फरक पडत नाही. हे बॅनर ठाकरे गटासाठी देखील असू शकतात.’. दुसरीकडे महायुतीतील या बॅनरवॉरवरून ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटाला देखील चिमटा काढला आहे. बघा कोकणात कसं रंगतंय बॅनर वॉर….

Published on: Jun 17, 2024 10:32 AM
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्…