राहुल गांधी समर्थक विरूद्ध सावरकर प्रेमी यांच्यात रंगले बॅनरवॉर, कुठं होताय आरोप-प्रत्यारोप
VIDEO | सोलापुरात उद्या सावरकर गौरव यात्रेचे आयोजन तर भाजपा विरुद्ध काँग्रेस पक्षाच्या बॅनरबाजीमुळे शहरात जोरदार चर्चा
सोलापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द झाल्यानंतर राजकीय वातावरण बदलल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने सावरकर यांच्या नावावर राजकारण करायला सुरुवात केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसचे राजकीय युद्ध सुरू असताना आता पुन्हा एकदा हे आंदोलनानंतर राहुल गांधी समर्थक विरूद्ध सावरकर प्रेमी यांच्यात बॅनरवॉरही रंगले आहे. भाजप आणि काँग्रेसने दोन्ही पक्षाने आपापल्या पक्षाची पोस्टर लावून एकमेकांवर टीका केली आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या बॅनर शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले. सोलापुरात उद्या सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने सावरकर गौरव यात्रेचेदेखील काँग्रेसच्या बॅनर शेजारीच लावण्यात आले आहेत. तर भाजपा विरुद्ध काँग्रेस पक्षाच्या बॅनरबाजीमुळे सोलापूर शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.