ठाण्यात पोस्टर वॉर, पोस्टर लिहून फेकतायत एकमेकांना उपमा देऊन बॉम्ब
ठाण्यात बॅनरबाजी... एकमेकांवर उपमांचे बॉम्ब! खोका, बोका आता पुढे काय?
ठाण्यातील कळवा परिसरात लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर असलेल्या संदेशातून नगरसेवकांना इशारा देण्यात आला आहे. राज्यात खोके संस्कृती सुरू झाली आहे, मात्र ठाणे, मुब्र्यात ती संस्कृती चालू देणार नाही, असे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल सांगितले होते. त्यानंतर कळव्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुरू झाली आहे. यावर खोका, बोका नगरसेवकांनो स्वतःला विकू नका, असा इशारा कळव्यातील समाजसेवक रविंद्र पोखरकर यांनी दिला होता. त्यानंतर आज कळव्यातील नागरिक नरेंद्र शिंदे यांनी लबाड बोका ढोंग करतोय अश्या आशयाचे बॅनर लावल्याचे बघायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राजकीय वातावर चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काल नगरसेवक फोडण्याच्या आरोपावरून कळव्यात जोरदार बॅनरबाजी केल्यानंतर आज लबाड बोका ढोंग करतोय, अशी बॅनरबाजी करत बाळासाहेबांच्या शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे २२ नगरसेवर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत असताना कळव्यात काल खोका बोका, नगरसेवकांनो स्वतःला विकू नका, असे आवाहन करण्यात आले असून शिंदे गटावर निशाणा साधला होता. तर आज लबाड बोका ढोंग करतोय, नगरसेवक कां सोडून चालले याचे आत्मपरीक्षण करा. नाही तर ‘तेल गेलं तूप गेल.. आता धुपाटनही राहणार नाही’ अशा आशयाची बॅनरबाजी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आली असून जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर देत ठाण्यात शिंदे विरुद्ध आव्हाड असे बॅनर वॉर पहायला मिळत आहे