पुण्यात राजकीय टोमण्यांचे बॅनर्स, #पक्षचोर अन् ढवळ्यापाशी पवळ्या…कुणावर साधला बॅनरबाजीतून निशाणा

| Updated on: Feb 08, 2024 | 2:50 PM

आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. अशातच पुण्यात राजकीय टोमणे असलेले बॅनर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे बॅनर आहेत,

पुणे, ८ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता मुंबईत अजित पवार यांचे जागोजागी बॅनर झळकलेत. अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळालंय तर या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. दरम्यान, आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. अशातच पुण्यात राजकीय टोमणे असलेले बॅनर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे बॅनर असून त्यावर “ढवळ्या पाशी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. नुकताच अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं यावर कार्यकर्ते आक्रमक झाले असून बॅनर लावत अजित पवारांवर टीका केली आहे.

Published on: Feb 08, 2024 02:50 PM
मंत्रिपदासाठी ठाकरेंना १ कोटीची चेक? दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
राज ठाकरे यांच्याकडून मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी, नेमकं कारण काय?