तेलंगणातील ‘या’ सत्ताधारी पक्षाचा महाराष्ट्रातही शिरकाव, आता कुठं झळकले बॅनर?
VIDEO | आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्ष एकटा लढणार की कोणासोबत युती करणार?
नाशिक : तेलंगणामध्ये सत्ताधारी असलेल्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीने आता महाराष्ट्रात देखील शिरकाव सुरू केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बी आर एस पक्ष आपले उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठाले बॅनर लावण्यात आले आहे. दीड कोटी मतदार नोंदणीचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, एम आय एम या व्यतिरिक्त मतदारांचा एक मोठा गट अस्वस्थ असून हे मतदार इनकॅश करण्याची तयारी भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने सुरू आहे. राज्यामध्ये पक्षाच्या पायाभरणीसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात होर्डिंग ,बॅनर्स, टोप्या, उपरणे, झेंडे, पक्षाची माहिती असलेले माहितीपत्रक वाटण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. तर आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्ष एकटा लढणार की कोणा सोबत युती करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.