मनसे नेते अविनाश जाधव यांना ‘त्या’ अल्टिमेटमनंतर मुंब्रा बंदीची नोटीस

| Updated on: Mar 28, 2023 | 2:42 PM

VIDEO | मुंब्रा डोंगरावरची मशीद हटवण्याच्या अल्टिमेटमनंतर अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदीची नोटीस, काय आहे प्रकरण?

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंब्रा डोंगरावरची मशीद हटवण्याच्या अल्टिमेटमनंतर अविनाश जाधव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये अविनाश जाधव यांना २७ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत मुंब्र्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मुंब्रा डोंगरावरची मशीद हटवण्यासाठी अविनाश जाधव यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. या अल्टिमेटमनंतर कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी अविनाश जाधव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर अविनाश जाधव म्हणाले, काल रात्री अकरा वाजता मला पोलिसांनी जी नोटीस दिलेली आहे, मला नोटीस देण्यापेक्षा जर कायद्याचं पालन करून ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात त्याच्यावर जर सरकारने लक्ष दिलं तर मला वाटतं की ही गोष्ट सतत होणार नसल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.

Published on: Mar 28, 2023 02:42 PM
2024 ला कुणासोबत जाणार, युती की मविआ?; राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितलं…
संजय राऊत यांचं एखाद्या ज्योतिषासारखं झालंय, ते काही बोलतात!; कुणाचं टीकास्त्र