Bappi Lahiri Passes Away | ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन

| Updated on: Feb 16, 2022 | 11:10 AM

अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु (Mumbai Hospital) असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली

अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु (Mumbai Hospital) असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.

Published on: Feb 16, 2022 10:05 AM
जे काही सरकारमध्ये सुरुये, त्याला दुरुस्त करण्याची वेळ आलीये : नाना पटोले
बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊत यांचं ट्विट, सलीम जावेद दोन्हो जेलमे जाएंगे, मोहित कंबोज यांचं प्रत्युत्तर