‘तुमची एकजूट असेल तर खात्री देतो…’, शरद पवारांनी बारामतीतून फुंकलं विधानसभेचं रणशिंग

| Updated on: Jun 19, 2024 | 12:47 PM

महाराष्ट्रात सत्तेत बदल करावा लागेल. तुमची जर एकजूट असेल तर तुम्हाला खात्री देतो. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपण सत्तेत बदल करू आपलं सरकार आणू आणि तुमचे जे प्रश्न आहेत ते कसे सुटत नाही हे मी बघून घेईन, शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून येत्या आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्रातील सत्तेत बदल करावा लागेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. इतकंच नाहीतर जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्याशिवाय पुढे जायचं, असं सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी उपस्थितांसमोर केल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या एकजुटीने सत्तेत बदल करू, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. ‘महाराष्ट्रात सत्तेत बदल करावा लागेल. तुमची जर एकजूट असेल तर तुम्हाला खात्री देतो. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपण सत्तेत बदल करू आपलं सरकार आणू आणि तुमचे जे प्रश्न आहेत ते कसे सुटत नाही हे मी बघून घेईन’, असं शरद पवार यांनी म्हटले.

Published on: Jun 19, 2024 12:47 PM
तुमच्या बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर… गोपीचंद पडळकरांचा कुणाला इशारा?
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हालाही पडणार महागात