पवारांच्या गोविंदबागेत दिवाळी पाडवा, शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची रिघ

| Updated on: Nov 02, 2024 | 10:56 AM

शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी यंदा दिवाळी पाडवा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांचा गोविंदबागेत तर काटेवाडीत अजित पवारांचा दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे.

दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे राज्यभरातील आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते गोविंदबागेत शरद पवारांना दिवाळी निमित्ती दिवाळी पाडव्याला भेटून दिपावलीच्या शुभेच्छा देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. मात्र यंदा पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवे साजरे केले जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी यंदा दिवाळी पाडवा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांचा गोविंदबागेत तर काटेवाडीत अजित पवारांचा दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. सकाळपासूनच शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंदबागेत कार्यकर्त्यांची मोठी रिघ पाहायला मिळाली. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी दरवर्षी येत असतो. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटायला येतो. गेली 18 वर्षे शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे यानिमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो, अशा भावना शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात.

Published on: Nov 02, 2024 10:56 AM
अजित पवारांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवे अन्…
MNS deepotsav 2024 : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण नेमकं काय?