Baramati Loksabha Election Exit Poll 2024 : बारामतीकरांचा कौल कुणाला? नणंद की भावजयला?

| Updated on: Jun 01, 2024 | 10:29 PM

इतिहासात पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार असा सामना निवडणुकीच्या निमित्ताने रंगल्याचे पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघामधून धक्का देणारा एक्झिट पोल समोर

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले. यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार असा सामना निवडणुकीच्या निमित्ताने रंगल्याचे पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघामधून धक्का देणारा एक्झिट पोल समोर आला आहे. Tv9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने होत्या. आता टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तर महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागा तर महायुतीला 22 जागा मिळणार असल्याचे समोर आले आहे.

Published on: Jun 01, 2024 10:28 PM
Bhiwandi Loksabha Election Exit Poll 2024 : बाळ्या मामा की कपिल पाटील?; एक्झिट पोलचा भुवया उंचावणारा अंदाज काय?
Kalyan Loksabha Election Exit Poll 2024 : कल्याण कुणाचे? एक्झिट पोलचं दान कुणाच्या पदरात?; श्रीकांत शिंदे की…