तुझी लायकी बघ XXX… शरद पवारांच्या कार्यकर्त्याला अजित दादांच्या आमदारांची शिवीगाळ, बघा व्हिडीओ
दत्ता भरणे यांचा व्हिडीओ इंदापूर तालुक्यातील असून या व्हिडीओमध्ये अजित दादांचा आमदार शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांला शिवीगाळ करताना दिसतोय. बारामतीमध्ये मतदान पार पडलं पण त्यापूर्वी दत्ता भरणे यांनी शरद पवारांच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केली.
अजित पवार यांच्या गटातील इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दत्ता भरणे यांचा व्हिडीओ इंदापूर तालुक्यातील असून या व्हिडीओमध्ये अजित दादांचा आमदार शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांला शिवीगाळ करताना दिसतोय. तर हा कार्यकर्ता नसून रोहित पवार यांच्या कंपनीचा कर्मचारी असल्याचे दत्ता भरणे यांनी म्हटलंय इतकंच नाहीतर त्यांनी पैसे वाटपाचा आरोप केलाय. बारामतीमध्ये मतदान पार पडलं पण त्यापूर्वी दत्ता भरणे यांनी शरद पवारांच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केली. तो कार्यकर्ता चुकीचा वागला हे त्याला दिसलं, म्हणून आपण त्याला रोखलं आणि त्याला चोप बसवण्यापासून रोखलं असं दत्ता भरणे यांनी म्हटलंय.तर ‘मला कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. मी तेथे गेलो तेव्हा एक बारामती अॅग्रो कारखान्याचा कर्मचारी तिथे लोकांना दमदाटी करत होता आणि त्यापूर्वी त्याने पैशाचं वाटपही केलं होतं. तिथे वाद सुरू होते. मी गेलो त्याला कळलं नाही. त्याने माझ्याबद्दलही अपशब्द वापरले.’, असं दत्ता भरणेंनी म्हटलं.