रोहित पवार स्वतः गुंड…कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणी केली जिव्हारी लागणारी टीका?

| Updated on: May 06, 2024 | 1:51 PM

अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय, असं रोहित पवार यांनी म्हटलं असून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यानं केला पलटवार

बारामतीमध्ये मतदारसंघात उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दोन्ही पवारांकडून काल जोरदार सांगता सभा झाल्यात. सुप्रिया सुळे यांचे प्रचारक रोहित पवार यांनी एक ट्वीट करत हल्लाबोल केलाय. अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय, असं रोहित पवार यांनी म्हटलं असून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावरच अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘हा काय गुंडांचे फोटो ट्विट करतोय. रोहित पवार हा स्वतः एक गुंड आहे. कर्जत जामखेडवरून कोणत्या गुंडांना घेऊन हा इथे आला आहे ते सांगू का? आणि हा काय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर बोलायला लागला. निवडणूक होईपर्यंत आम्ही यांना किंमत देणार नाही. रोहित पवार हा गुंड तर आहेच पण तो ड्रामेबाझ आणि नाटकी सुद्धा आहे. त्याने कालच्या सभेत सुद्धा हेच केलं रडायचं नाटक आणि तो हे करणार हे आम्हाला माहिती होत, असं म्हणत मिटकरींनी सडकून टीका केली.

Published on: May 06, 2024 01:51 PM
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण… सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत… नारायण राणेंवर पलटवार करत कुणाची जिव्हारी लागणारी टीका?