आता ही तुतारी तुमची चांगलीच…, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
संजय राऊत यांनी पुरंदरमधील प्रचार सभेतून अजित पवार यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र आता याच बालेकिल्ल्यात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना दिसतोय. पुरंदरमधील प्रचार सभेतून संजय राऊत यांचा हल्लाबोल काय?
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुरंदरमधील प्रचार सभेतून अजित पवार यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र आता याच बालेकिल्ल्यात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना दिसतोय. पुरंदरमधील प्रचार सभेतून हल्लाबोल करत संजय राऊत म्हणाले, ज्या शरद पवारांनी पक्ष वाढवायला तुमच्या हातात दिला, तुम्ही कायं केलं, असा हल्लाबोल त्यांनी केला. आता आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते, असे हरामखोर 10 हजार वर्षात झाले नाही. तुम्ही आम्हाला शिकवू नका, आता ही तुतारी तुमची बरोबर वाजवणार आहे. आमची सगळी शिवसेना सुप्रिया ताईंच्या मागे ठाम पणे उभी आहे, असे संजय राऊत म्हणाले. कोणीतरी ऐरेंगेरे गुजरातमधून येणारं आणि आमच्या पराभवासाठी बारामतीमध्ये ठाणं मांडून बसणार आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्हाला शरद पवार यांना संपवायचं आहे. आले किती गेले किती बारामतीमध्ये शरद पवार यांचा दरारा असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.