पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा

| Updated on: Apr 28, 2024 | 4:28 PM

राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरूद्ध महाविकास आघाडीतील शरद पवार गटातील सुप्रिया सुळे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पुण्यातील आंबेगाव येथे सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

सध्या बारामती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात पवार विरूद्ध पवार असा समना रंगताना पाहायसा मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरूद्ध महाविकास आघाडीतील शरद पवार गटातील सुप्रिया सुळे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पुण्यातील आंबेगाव येथे सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सुनेत्रा पवार या बारामतीतील महायुतीच्या उमेदवार असून प्रचारादरम्यान, सुनेत्रा पवार यांनी जोरदार फटेकाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार यांच्या क्रेकेटच्या मैदानात फटकेबाजीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात त्याची चर्चा आहे. तुम्ही पाहिला का सुनेत्रा पवार यांच्या फटकेबाजीचा व्हिडीओ…

Published on: Apr 28, 2024 04:28 PM
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?