मतदानावेळी ताई दादांच्या घरी? अजित पवारांच्या बंगल्यावर सुप्रिया सुळे का आल्या?

| Updated on: May 08, 2024 | 10:47 AM

बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत रंगत असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी का पोहोचल्या? राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दादांच्या घरी जाण्याचं कारण सांगितलं...

बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी आल्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत रंगत असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी का पोहोचल्या? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी दादांच्या घरी जाण्याचं कारण सांगितलं. आपण अजित पवारांच्या भेटीसाठी नाहीतर अजित पवारांच्या आई आशा काकूंच्या भेटीसाठी आल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळे जेव्हा घरी आल्या तेव्हा अजित पवार घरीच होते मात्र आपली त्यांच्याशी भेट झाली नाही. तसेच आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सुळेंनी म्हटलं तर अजित पवारांनी यावर अधिक न बोलता, आपल्याला काही माहिती नाही तर मी घरीच नव्हतो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: May 08, 2024 10:47 AM
महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान, कुठं किती टक्के मतदान? कुठं झाली कमाल तर कुठं वाढलं टेन्शन?
तुझी लायकी बघ XXX… शरद पवारांच्या कार्यकर्त्याला अजित दादांच्या आमदारांची शिवीगाळ, बघा व्हिडीओ