एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता… अजितदादांच्या वक्तव्यावरून चर्चा, राजकीय लढाई टोकाला

| Updated on: May 02, 2024 | 12:14 PM

शरद पवार यांनी मी दैवत मानत होतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी ऑन कॅमरा केलं आहे. या वक्तव्यानंतर शरद पवार गट अजित पवारांवर चांगलाच तुटून पडला आहे. फुटीच्या आधीपर्यंत शरद पवार हे अजित पवारांचे दैवत होते आणि आता नाही? विरोधकांचा अजित पवारांवर एकच हल्लाबोल

बंडासह राजकीय लढाई सुद्धा टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी मी दैवत मानत होतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी ऑन कॅमरा केलं आहे. या वक्तव्यानंतर शरद पवार गट अजित पवारांवर चांगलाच तुटून पडला आहे. फुटीच्या आधीपर्यंत शरद पवार हे अजित पवारांचे दैवत होते आणि आता नाही, असाच अर्थ दादांच्या वक्तव्याने निघतोय. यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधलाय. तर संजय राऊत यांनीही अजितदादांवर बोलताना हल्लाबोल केलाय. ‘आमचं सरकार आल्यावर अजित पवारांना ईडीची नोटीस जाईल ते पुन्हा दैवत बदलतील’, असे म्हणत राऊतांनी डिवचलं आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजकीय लढाई पवार विरूद्ध पवार अशीच झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील संबंधही किती ताणले गेलेत हे जाहीरपणे दिसतंय. बघा याच राजकीय लढाईचा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 02, 2024 12:14 PM
संजय शिरसाटांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’, चंद्रकांत खैरेंच्या ‘नमाज’च्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केला हल्लाबोल?