Baramati Loksabha Election Result 2024 : बारमतीत पवार vs पवार लढतीत कोण आघाडीवर? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार?

| Updated on: Jun 04, 2024 | 9:46 AM

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले. यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगल्याचा पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले. यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगल्याचा पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आलेल्या Tv9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्रा पवार पिछाडीवर तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवाजदीचे उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे समोर आले होते. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असतानादेखील सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे दिसतंय तर सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. सध्या आलेल्या अपडेटनुसार, सुप्रिया सुळे या ६ हजार ९४१ मतांनी आघाडीवर आहेत.

 

Published on: Jun 04, 2024 09:46 AM
Thane Lok sabha Election Result 2024 : मुख्यमंत्री शिंदेंच्या होमपीचवर काय परिस्थिती?; शिंदे vs ठाकरे गटाच्या लढाईत कोण आघाडीवर?
Lok Sabha Election Result 2024 : निकालात देशाचे आकडे रंजक स्थितीत अन् शेअर बाजार धाडकन कोसळला