Special Report | टीम इंडियाच्या डाएट प्लॅनमध्ये हलाल?
दोन दिवसांपूर्वी बीसीसीयआयनं टीम इंडियासाठी नवा डाएट प्लॅन जारी केला होता. त्या प्लॅनचं सक्तीनं पालन करण्याच्या सूचना खेळाडूंना देण्यात आल्याच्या चर्चा होत्या.
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमच्या नव्या डाएट प्लॅन वरुन वादाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना केवळ हलाल प्रमाणित मटण खाण्यास परवानगी देण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटवर #BCCI_Promotes_Halal या नावानं ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये बीसीसीआयवर टीका केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीयआयनं टीम इंडियासाठी नवा डाएट प्लॅन जारी केला होता. त्या प्लॅनचं सक्तीनं पालन करण्याच्या सूचना खेळाडूंना देण्यात आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, बीसीसीआयनं अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं म्हटलंय.