VIDEO : अस्वलाने पिटाळले वाघाला, वन्यजीव विश्वातील घटना कॅमेऱ्यात कैद | Viral Video |

| Updated on: Mar 09, 2022 | 1:16 PM

अस्वलाने वाघासमोर आपल्या आक्रमक मुद्रेचे प्रदर्शन केले आहे. होय. वाघाला सर्वच प्राणी घाबरतात मात्र या अस्वलाने असे काही केले की वाघही पाहतच राहिला. चंद्रपुरातील ताडोबा  व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ आहे. जंगली प्राणी आणि त्यांच्या करामती आपण नेहमीच पाहत असतो. आता अस्वलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

अस्वलाने वाघासमोर आपल्या आक्रमक मुद्रेचे प्रदर्शन केले आहे. होय. वाघाला सर्वच प्राणी घाबरतात मात्र या अस्वलाने असे काही केले की वाघही पाहतच राहिला. चंद्रपुरातील ताडोबा  व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ आहे. जंगली प्राणी आणि त्यांच्या करामती आपण नेहमीच पाहत असतो. आता अस्वलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अस्वलाने वाघासमोरच आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखवली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात समोरा-समोर आलेल्या वाघ आणि अस्वलाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आणि अनोखे दृश्य लखनऊच्या नमन अग्रवाल या पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केले आहे. सोमवारी दुपारी टायगर सफारीच्या दरम्यानची ही घटना आहे.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 9 March 2022
VIDEO : Nawab Malik कौन है? देश का गद्दार है, विधानभवनाच्या पायऱ्यांवर BJP ची घोषणाबाजी