Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ

| Updated on: Jan 15, 2025 | 5:32 PM

सीआयडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस व्हॅनमधून जेलच्या दिशेला घेऊन जाण्यात आलं. मात्र पोलीस कराडला व्हॅनमधून घेऊन जात असताना कोर्टाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात आज याप्रकऱणी महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापला युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाकडून हा निकाल जाहीर कऱण्यात आला. सीआयडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस व्हॅनमधून जेलच्या दिशेला घेऊन जाण्यात आलं. मात्र पोलीस कराडला व्हॅनमधून घेऊन जात असताना कोर्टाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. आंदोलकांकडून कोर्टाबाहेर वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर वाल्मिक कराडचे समर्थकदेखील कोर्टाबाहेर जमले. त्यांच्याकडूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान विशेष म्हणजे वाल्मिक कराडची कोर्टात बाजू मांडणारे वकील सिद्धेश्वर ठोंबरे हे देखील आक्रमक झाल्याचे दिसले. इतकंच नाहीतर वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वाल्मिक कराडचे समर्थक आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

Published on: Jan 15, 2025 05:24 PM
Walmik Karad BIG Breaking : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, वाल्मिक कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
Santosh Deshmukh Case : कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्…