बीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर

| Updated on: Dec 05, 2021 | 10:52 AM

बीडमध्ये गेल्या 32 दिवसांपासून बसस्थानक परिसरामध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विनंती करून देखील आंदोलन मागे घेतले जात नसल्याने, अखेर आगार प्रशासनाने हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.

बीड : आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरूच आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून वेतनवाढीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर देखील अनेक जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलिनिकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. बीडमध्ये गेल्या 32 दिवसांपासून बसस्थानक परिसरामध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विनंती करून देखील आंदोलन मागे घेतले जात नसल्याने, अखेर आगार प्रशासनाने हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. तर महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर झाले.