Santosh Deshmukh Case : बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?

| Updated on: Dec 19, 2024 | 4:50 PM

संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचं या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. मारहाणीमुळे शरिरातून अतिरक्तस्त्राव झाला. शॉकमध्ये गेल्यामुळे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला, असा उल्लेख शवविच्छेदन अहवालात करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचं या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. मारहाणीमुळे शरिरातून अतिरक्तस्त्राव झाला. शॉकमध्ये गेल्यामुळे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला, असा उल्लेख शवविच्छेदन अहवालात करण्यात आला आहे. यासह संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांची छाती, डोकं, हात-पाय, चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. चेहरा, डोळ्यांचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. संतोष देशमुख यांचा मृत्यू हॅमरेड अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिजमुळे झाला आहे. बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची माहिती आहे. दरम्यान, नुकतेच बीड सरपंच हत्येप्रकरणी चौथा आरोपी विष्णु चाटेला ९ दिवसांनंतर अखेर अटक झाली आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तीन आरोपी फरार आहेत. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपीसह तीन जण फरार आहेत.

Published on: Dec 19, 2024 04:50 PM